कल्याण क्राईम ब्रँच पोलिसांची मोठी कारवाई
नामांकित कंपनीच्या एक्सपायरी डेटच्या खाद्यपदार्थ विकणाऱ्या दोघांना अटक.
27 लाखांच्या खाद्यपदार्थ जप्त करून दोघांना केली अटक.
Anc कल्याण क्राईम ब्रँच पोलिसांनी कल्याण मधील मच्छी मार्केट परिसरात छापा टाकून एक्सपायरी डेट च्या खाद्यपदार्थ विकणाऱ्या दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे मोझेस वेलनेस या नामांकित कंपनीचे खाद्यपदार्थ ज्यामध्ये मल्टी विटामिन टोमॅटो सॉस पास्ता, पीनेट बटर यासारख्या अनेक खाद्यपदार्थांची विक्री सुरू होती. या प्रकरणात अब्दुल खान आणि बिरबल यादव या दोघांना अटक करण्यात आली आहे. यांच्याकडून जवळपास 27 लाखांचे एक्सपायरी डेटच्या खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहे. एक्सपायरी डेट संपल्यानंतर अटक करण्यात आलेले आरोपी नामांकित कंपनीच्या स्टिकर काढून तारीख वाळवून स्वतःच्या स्टिकर लावायचे. गेल्या सहा महिन्यांपासून नागरिकांशी जीवाशी खेळ सुरू असल्याची माहिती आता समोर आली आहे. या प्रकरणाच्या पुढील तपास सुरू आहे. प्रश्न असा आहे की या सर्व चौकशीसाठी अन्न आणि औषध विभाग नेमला गेला आहे. या विभागाचे अधिकारी करतात तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे.
बाईट अजित शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण क्राईम ब्रांच
