29 मे रोजी पथविक्रेता सदस्य समिती निवडणूक 2026-27
केंद्र शासनाकडील पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम 2014 चे मधील कलम 36 व्दारे पोट कलम (1) व्दारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ या राजपत्राव्दारे शहरांमधील पथविकेत्यांचे बाबत नियम व आदेश प्रसिद्ध केले होते. सदर शासनाच्या नियम आदेशामधील प्रकरण 4 मधील कलम 15 (भाग-1) मध्ये नमूद केल्याप्रमाणे शहरातील पथ विक्रेत्याचे सर्वेक्षणाव्दारे नोंदणीकृत पथविक्रेत्यांची मतदारयादी तयार करून त्यांची निवडणूक घेणे अनिवार्य आहे.
महाराष्ट्र शासन, नगर विकास विभागाने राजपत्र असाधारण भाग 4 अ अन्वये एकूण 08 सदस्यांची शहर फेरीवाला समिती स्थापन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या पथविक्रेता निवडणूक नियम प्रणालीमध्ये नमूद केलेल्या एकूण 20 सदस्य संख्येध्ये 08 पथविक्रेते सदस्य असणार आहेत. सदरचे 08 पथविक्रेता सदस्य पथविक्रेता मधून निवडणुकीव्दारे निवडून द्यावयाचे आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ या शासन राजपत्राव्दारे अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, इमाव अल्पसंख्याक, विकलांग व्यक्ती व खुला प्रवर्ग या जातीय संवर्गचा उल्लेख केला आहे. तसेच 1/3 हे महिलांना आरक्षण देण्यात यावे, असे नमूद केलेले आहे.
त्यापैकी एक जागा सर्व साधारण महिलांसाठी राखीव आहे. दि.16 / 04 / 2026 रोजी पथविक्रेत्यांच्या उर्वरित 02 महिला राखीव जागा करीता आरक्षण सोडत पध्दतीने घेण्यात आली. यामध्ये 01 जागा अनुसूचित जाती महिला व एक जागा इतर मागास प्रवर्ग महिलांकरीता याप्रमाणे सोडतीद्वारे निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच वर नमुद केल्याप्रमाणे एकुण 08 पथविक्रेत्यांच्या सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात येणार असून त्याचे नियोजन खालीलप्रमाणे करण्यात आले आहे.
| अ.क्र. | विषय | दिनांक व वार | वेळ | स्थळ |
| 1 | नामनिर्देशन पत्राचे वाटप करणे | 06/05/2026 बुधवार 07/05/2026 गुरुवार | 11:00 ते दु. 03:00 | नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भुखंड क्र.1,किल्ले गांवठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर-15ए, सी.बी.डी., बेलापुर, नवी मुंबई-400 614.
|
| 2 | नामनिर्देशन पत्र स्वीकारणे. | 14/05/2026 गुरुवार | 11:00 ते दु. 03:00 | |
| 3 | प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी करणे | 15/05/2026 शुक्रवार | 11:00 ते छाननी संपेपर्यंत | |
| 4 | प्राप्त नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिध्द करणे | 15/05/2026 शुक्रवार | छाननीनंतर | |
| 5 | आक्षेप अर्ज स्वीकारणे | 19/05/2026 मंगळवार | 11:00 ते दु. 03:00 | |
| 6 | वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे. | 19/05/2026 मंगळवार | दु. 03:00 नंतर | |
| 7 | नामनिर्देशन पत्र मागे घेणे | 20/05/2026 बुधवार | सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत | |
| 8 | माघारी नंतरची अंतिम यादी प्रसिध्द करणे | 20/05/2026 बुधवार | सायंकाळी 5:00 नंतर | |
| 9 | मतदान घेणे | 29/05/2026 शुक्रवार | 07:30 ते सायं.05:00 | |
| 10 | मत मोजणी | 29/05/2026 शुक्रवार | सायंकाळी 06:00 पासुन | |
| 11 | निवडणुक निकाल जाहीर करणे | 29/05/2026 शुक्रवार |
मतमोजणीनंतर |
याबाबत नगरपथविक्रेत्यांच्या प्रभागनिहाय मतदार यादया संबंधीत प्रभाग समिती (1,2,3,4,5,6,7 व 8) कार्यालयामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तसेच नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय (परवाना कक्ष) येथे नगरपथविक्रेत्यांच्या पूर्ण मतदार यादी पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
तरी महापालिका आयुक्त, नवी मुंबई व पथविक्रेता निवडणूक निर्णय अधिकारी, नवी मुंबई यांच्यामार्फत संबंधित सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की, सदर निवडणुकीमध्ये सक्रीय सहभाग घेऊन सदरची निवडणुक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यास महानगरपालिकेस सहकार्य करावे.
