29 मे रोजी पथविक्रेता सदस्य समिती निवडणूक 2026-27
29 मे रोजी पथविक्रेता सदस्य समिती निवडणूक 2026-27 केंद्र शासनाकडील पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम 2014 चे मधील कलम 36 व्दारे पोट कलम (1) व्दारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ या राजपत्राव्दारे शहरांमधील पथविकेत्यांचे बाबत नियम व आदेश प्रसिद्ध केले होते. सदर शासनाच्या नियम आदेशामधील प्रकरण 4 मधील कलम 15 (भाग-1) मध्ये नमूद केल्याप्रमाणे शहरातील पथ विक्रेत्याचे सर्वेक्षणाव्दारे नोंदणीकृत पथविक्रेत्यांची मतदारयादी तयार करून त्यांची निवडणूक घेणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र शासन, नगर विकास विभागाने राजपत्र असाधारण भाग 4 अ अन्वये एकूण 08 सदस्यांची शहर फेरीवाला समिती स्थापन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या पथविक्रेता निवडणूक नियम प्रणालीमध्ये नमूद केलेल्या एकूण 20 सदस्य संख्येध्ये 08 पथविक्रेते सदस्य असणार आहेत. सदरचे 08 पथविक्रेता सदस्य पथविक्रेता मधून निवडणुकीव्दारे निवडून द्यावयाचे आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ या शासन राजपत्राव्दारे अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, इमाव अल्पसंख्याक, विकलांग व्यक्ती व खुला प्रवर्ग या जातीय संवर्गचा उल्लेख केला आहे. तसेच 1/3 हे महिलांना आरक्षण देण्यात यावे, असे नमूद केलेले आहे. त्यापैकी…
