सन 2026-27 मधील नमुंमपा क्षेत्रातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दि. 31 मार्च 2026 अखेर खालील प्राथमिक शाळा शासनाची / नवी मुंबई महानगरपालिकेची मान्यता न घेता अनधिकृत चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. आर.टी.ई. अधिनियम 2009 मधील कलम-18 अन्वये कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही.
तथापि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 5 शाळा विनामान्यता चालविण्यात येत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
| अ.क्र. | संस्थेचे नांव | शाळेचे नांव व पत्ता | माध्यम | शेरा |
| 1 | इस्माइल एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई | अल मोमीन स्कुल, आर्टिस्ट व्हिलेज, सेक्टर-8 बी, सी.बी.डी. बेलापूर. | इंग्रजी | न्यायप्रविष्ट बाब (रीट –
याचिका क्र. 6565/2023) |
| 2 | ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट, अग्रीपाडा, मुंबई | इकरा इंटरनॅशनल ॲण्ड मक्तब स्कुल, सेक्टर-27, नेरूळ | इंग्रजी | – |
| 3 | एक्सलेंस चेरिटेबल ट्रस्ट खैरणे गाव, सेक्टर-१२ डी, कोपरखैरणे, नवी मुंबई. | अॅग्नल प्रि-प्रायमरी कॉनव्हेन्ट स्कूल हाऊस नं-296 सेक्टर 12 डी, खैरणेगाव, नवी मुंबई | इंग्रजी | – |
| 4 | गुरुदास सेवा समिती, घणसोली, नवी मुंबई. | विश्वभारती स्कुल, प्लॉट नं. 1 से.2 कोपरखैरणे, नवी मुंबई. | इंग्रजी | (इयत्ता 1 ली ते 5वी पर्यंतच्या वर्गाला मान्यताप्राप्त आहे. 6 वी ते 8 वी चे वर्ग अनधिकृत आहेत.) |
| 5 | किंगडम वेलफेअर चॅरिटी अॅन्ड कॉनव्हेन्ट, वाशी, सेक्टर-17, सी-8, वाशी, नवी मुंबई. | चिरिस्ट द किंग सेकंडरी स्कुल, कोपरखैरणे, प्लॉट नं-66, डि-मार्ट जवळ, कोपरखैरणे, सेक्टर-15, नवी मुंबई | इंग्रजी | (इयत्ता 1 ली ते 7वी पर्यतचे वर्गाला मान्यता प्राप्त आहे. आणि आठवी चा वर्ग अनधिकृत आहेत.) |
तरी संबंधित पाचही शाळा व्यवस्थापकांनी पालकांशी संपर्क साधून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजिक असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या किंवा अन्य मान्यताप्राप्त खाजगी शाळेत पुढील शिक्षणासाठी दाखल करावे आणि परवानगीशिवाय सुरू केलेली शाळा बंद करावी.
तसेच या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत असे आवाहन करण्यात येत आहे. ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश या अनधिकृत शाळेत घेतले आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश रद्द करून नजीकच्या शासनमान्य शाळेत प्रवेश घ्यावा, जेणेकरून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असेही आवाहन नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
