दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची हाक, वातावरण तापण्याची चिन्हे
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला परिसरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप तसेच काही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाची हाक दिली असून काही मागण्यांसह इशारा दिला आहे.
माहितीनुसार, आंदोलकांनी रस्त्यावर नमाज बंद करण्याची मागणी करत, हिंदूंना दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या मंदिरात मुक्त प्रवेश द्यावा, अशी भूमिका मांडली आहे। अन्यथा बकरी ईदच्या दिवशी किल्ला परिसरात हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तोत्र पठण करण्याचा इशारा देण्यात आला आहे।
यापूर्वीही या मुद्द्यावरून स्थानिक पातळीवर वाद निर्माण झाले होते. आता बकरी ईदच्या दिवशी शिवसेनेनंतर भाजपनेही आंदोलन करण्याची घोषणा केल्याने परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।
दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले असून परिसरात बंदोबस्त वाढवण्याची शक्यता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे।
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
