पुणे मेट्रोच्या नव्या मार्गाचे उद्घाटन आणि #मेट्रो फेज-2 च्या भूमिपूजनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी ते हिंजवडी फेज-2 असा सुमारे सहा किलोमीटरचा #मेट्रोप्रवास केला.
या मार्गावरील #पहिलेतिकीट मुख्यमंत्र्यांनी स्वतः खरेदी केले. प्रवासादरम्यान त्यांनी शाळकरी विद्यार्थिनी आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून मेट्रोतील सुविधा, प्रवासाचा अनुभव आणि नव्या मार्गामुळे होणाऱ्या फायद्यांची माहिती घेतली.
या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे पिंक मेट्रोचे संचालन महिला ट्रेन पायलटने केले. लीड ट्रेन पायलट प्रगती बिरादार आणि ट्रेन पायलट ऐश्वर्या सूर्यपूजारी यांनी मेट्रोचे सारथ्य केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी उपस्थित होते.





