अधिकाऱ्यांना झालेल्या त्रासा पोटी त्वरित अतिक्रमन हटविले, सर्वसामान्य नागरिकांचे काय..?
_________________________________
मूर्तिजापूर :- शहरातील स्टेशन विभाग परिसरात चक्क एका भामट्याने उपविभागीय अधिकारी यांच्या गाडीसमोर येऊन गाडी अडविल्याने तात्काळ येथील अतिक्रमन काढण्याची कारवाई करण्यात आली मात्र कित्येक दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासाच काय असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.
मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभाग परिसरात राजपत्रित अधिकाऱ्यांचे निवासस्थान आहे. जेथे उपविभागीय अधिकारी, मुख्य न्यायाधीश, तहसीलदार, वनविभाग अधिकारी, विस्तार अधिकारी आदी राजपत्रित अधिकाऱ्यांचे निवासस्थान असून समाज कल्याण कार्यालय, २ मोठ्या शाळा ही असल्याने या मार्गांवरून दररोज अधिकारी वर्ग, विद्यार्थी पालक वर्गांची वर्दळ कायम असते. तर श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कारंजा रोडवर नेभनानी कॉम्प्लेक्स मध्ये एक वाईन शॉपी असल्याने मद्य खरेदी करीता मद्यप्रेमींची वर्दळ असते, रस्त्याच्या कडेला छोटे- छोटे दुकाने लावली आल्याने शॉपीतून मद्य घेऊन रस्त्यालगत मद्यपिणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी मुर्तीजापुर चे उपविभागीय अधिकारी आपल्या निवासस्थानी जात असतांना अज्ञात एका भामट्याने त्यांचे वाहन अडवून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने नगर परिषदेने चक्क येथील अतिक्रमन २४ तासाच्या आत पोलीस बंदोबस्तात हातवीण्याचे काम केले आहे. मात्र अधिकाऱ्यांना झालेल्या त्रासाची त्वरित दखल घेऊन अतिक्रमण हटविण्याची कारवाई शासनाने केली तर त्याच धर्तीवर दररोज येणाऱ्या जाणाऱ्या शालेय विद्यार्थी अथवा सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाचं काय..? असा सवाल नागरिकांनी केलाय.
एकीकडे पथविक्रेत्यांना शासनाच्या वतीने पंतप्रधान स्वनिधी अंतर्गत कर्ज दिल्या जाते तर या पथविक्रेत्यांकडून नगरपरिषदेच्या वतीने २० रुपये दररोज अतिक्रमीत जागेचे भाडे ही आकारल्या जाते त्याच ठिकाणी आपल्या पोटाची खरेदी भागवणाऱ्या हात मजुरांच्या दुकानावर अतिक्रमण आणून ऐन दिवाळी चा सण तोंडावर असताना उपासमारीचे वेळ शासन आणत असल्याचे बोलत,
“आम्ही न केलेल्या कृत्याची शिक्षा आम्हास भोगावी लागत असून ज्याने कृत्य केले तो मात्र मोकाटच” हा कुठला शासनाचा न्याय अश्या संतप्त प्रतिक्रिया पथविक्रेत्यांकडून येत आहे.
_________________________________
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News मूर्तिजापूर -अकोला.