जामठी येथे दोन गटात दगडफेक..!
_________________________________
अकोला :- ऐन विधानसभा निवडणुका तोंडावर असताना जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात येत असलेल्या माना पोलीस स्टेशन अंतर्गत जामठी (हिरा माता) येथे दोन गटतात वाद होऊन हाणामारी व दगडफेक करण्यात आल्याने गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.
गेल्या ६ महिन्यांपासून जामठी (हिरा माता) येथील वेगवेगळ्या दोन परिसरातून विशिष्ट समाजाच्या काही नागरिकांकडून रात्रीच्या सुमारास दगडफेक करण्याच्या घटना सुरु होत्या मात्र मंगळवार दि. २२ रोजी संध्याकाळी ७ ते ८ वाजताच्या सुमारास अचानक दोन विविध समाजाच्या घरावर दगदफेक करण्यात आली. या दगडफेकीत एका ६ ते ७ वर्षाच्या मुलास दगड लागून जखमी झाल्याने मुलाच्या पाल्ल्याने परिसरात मोठा राडा करून विशिष्ट समाजास शिवीगाळ केली. या मुळे विशिष्ट समाजाच्या नागरिकांचा मोठ्या प्रमाणात जमाव झाला. या मुळे जामठी या गावात काही काळ तनावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच माना पोलीसांचा ताफा घटना स्थळी पोहचून परिस्थिती आटोक्यात आणली, असली तरीही गेल्या महिन्याभरातील ही जिल्ह्यातील तिसरी घटना आहे. मात्र कुठल्याही गटाचा व्यक्ती तक्रार देण्यास आला नसल्याने कोणावरही गुन्हा नोंदविण्यात आला नसल्याचे माना पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सुरज सुरोसे यांनी सांगितले आहे.
_________________________________
विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर – अकोला.