“जय श्रीराम” च्या जय-घोषात मूर्तिजापूरात मोटारसायकल रैली संपन्न..!
सार्वजनिक श्रीराम नवमी जन्मोत्सव समिती व सकल हिंदू समाज मूर्तिजापूर च्या वतीने आयोजन
—————————————-
मूर्तिजापूर :- हिंदू बांधवांचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम नवमीनिमित्त सार्वजनिक श्रीराम नवमी जन्मोत्सव समिती व सकल हिंदू समाज मूर्तिजापूरच्या संयुक्त विद्यमाने शहरातील जुनी वस्ती स्थित असलेल्या श्रीराम मंदिर व स्वामी समर्थ मंदिर येथून भव्य मोटारसायकल रैली ला सुरवात करण्यात आली या रॅलीचे समापन स्टेशन विभाग परिसरातील श्रीराम मंदिर येथे करण्यात आले.
. प्रभू श्रीराम नवमी निमित्त शहरात ठिक -ठिकाणी चौका चौकात भगवे झेंडे, पताका फडकविल्याने मूर्तिजापूर शहर भगवामय झाले होते.
“जय श्रीराम, जय, जय श्रीराम ” च्या जय घोषात मूर्तिजापूर नगरीत आवाज दुमदूमल्याचे जाणवत शहरातील जुनी वस्ती स्थित असलेल्या श्रीराम मंदिर, स्वामी समर्थ मंदिर,महाराजा चौक,मोरारजी चौक, वीर भगतसिंग चौक, बायपास रोड, कारंजा चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेल्वे स्टेशन परिसरातून मार्गक्रम करत श्रीराम नवमी निमित्त निघालेल्या मोटर सायकल रॅलीचे समारोपण स्टेशन विभाग परिसरातील श्रीराम मंदिरात करण्यात आले.
सार्वजनिक श्रीराम नवमी जन्मोत्सव समिती व सकल हिंदू समाज मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोटर सायकल रॅली मध्ये भगवे दुपट्टे व गाडीला भगवा झेंडा तर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात भगवा झेंडा घेत युवक -युवतीनीं “जय श्रीराम, जय जय श्रीराम ” चा नारा देत शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढली. सदर रॅलीत हजारोच्या संख्येने नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला.
यावेळी मूर्तिजापूर शहर पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
—————————————-
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.