महाराष्ट्र वीरशैव लिंगायत रूद्रभुमी निवारण समितीची पहिली सभा शेगांव येथे पार पडली.
गाव तिथे रुद्रभूमीसाठी मुख्यमंत्र्यांना पंधरा दिवसांमध्ये 11000 पोस्ट कार्ड लिंगायत समाजाच्या वतीने पाठवण्यात येतील
शेगांव – वीरशैव लिंगायत समाजाला रूद्रभूमी म्हणजेच स्मशानभूमी साठी जागा मिळावी यासाठी महाराष्ट्र वीरशैव लिंगायत रुद्रभूमी निवारण समिती लिंगायत समाजाच्या वतीने महाराष्ट्र वीरशैव सभेचे प्रदेश उपाध्यक्ष महेश आप्पा लक्ष्मण आप्पा शेटे यांची समितीवर अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
वीरशव लिंगायत समाज हा स्वतंत्र धर्म असून महाराष्ट्रामध्ये दीड कोटीच्या वर तर विदर्भामध्ये 32 लाखाच्या जवळपास आहे, लिंगायत समाजातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचा दफनविधी केला जातो, परंतु या समाजाला स्वतःची दफनभूमी, स्मशानभूमी किंवा रुद्रभूमी नसून समाज बांधवांचा मृतदेह दफन करायला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
प्रत्येक तालुक्यामध्ये शासनाने दोन ते तीन एकर जागा लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून द्यावी, या साठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावण्यात येईल. असा निर्णय वीरशव लिंगायत समाजाच्या रुद्र भूमी निवारण समितीने घेतला.
यावर बोलताना महाराष्ट्र वीरशेव लिंगायत रुद्रभूमी निवारण समितीचे अध्यक्ष महेश आप्पा लक्ष्मण आप्पा शेटे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.