*कॅप्शन*- *जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहणावर आगीची झडप..!*
—————————————-
*अकोला :-* जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिस स्टेशन हद्दीतील कानशिवनी ते यळवण मार्गावर जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनाने पेट घेत आगीच्या भक्ष्यस्थानी जळुन खाक झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडलीय… सुदैवाने या घटनेत जनावरे सुरक्षित आहेत, मिळालेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू पोलिस स्टेशन हद्दीतील अकोल्यातील कानशिवनी ते यळवण मार्गावर जनावरांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू पिकअप वाहनाने अचानक पेट घेतला, दरम्यान या वाहनातून जनावरांची वाहतूक होत असल्याचे बोलले जाते, दरम्यान सदर वाहनाला आग कशी लागली याचे कारण कसा मात्र समजू शकले नाहीय… सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी नाहीय ,रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आलीये… *प्रतिनिधी नितीन टाले, CEN News, अकोला*