*बदलत्या काळानुरुप पोलीस खाते अद्ययावत, सुविधायुक्त असावे*
– ना. ॲड आकाश फुंडकर
*जलंब, पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतींचे भूमिपूजन*
—————————————-
*बुलढाणा (खामगांव):-*
लोकांमध्ये शांतता आणि कायद सुव्यस्था राखण्यात पोलीसांची महत्त्वाची भूमिका असते. बदलत्या काळानुसार पोलीस खाते अद्ययावत, सर्व सुविधायुक्त असले पाहिजेत, असे प्रतिपादन कामगार मंत्री ना.ॲड.आकाश फुंडकर यांनी आज येथे केले.
खामगाव विधानसभेचे आमदार तथा राज्याचे कामगार मंत्री ना. ॲड आकाश फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जलंब आणि पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ना.ॲड फुंडकर बोलत होते. या कार्यक्रमात अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पोलीस उप अधीक्षक कारखेडे, तहसिलदार दिपक बाजड आदी अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
————————————-
*जिल्हा प्रतिनिधी इस्माईल शेख, CEN News खामगाव -बुलढाणा..*