श्रीराम नवमी निमित्य सुप्रसिद्ध गायिका अनुष्का व आदिष्टा भटनागर मूर्तिजापूरात..!
मूर्तिजापूर :- येथील जुनी वस्ती स्थित चंद्रशेखर आझाद (मोरारजी चौक) चौक येथे समाजसेवक आतिष महाजन यांच्या वतीने दरवर्षी विविध धार्मिक उपक्रम राबविले जातात त्याच अनुषंगाने यंदा प्रभू श्रीराम नवमी रविवार दि. ६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता मध्य प्रदेश च्या मंदसौर येथील सुप्रसिद्ध गायिका अधिष्टा व अनुष्का भटनागर यांच्या सुमधुर वाणीतून भजन संध्येचे आयोजन श्रीराम प्रतिष्टान च्या वतीने करण्यात आले असल्याचे पत्रकार परिषदेत आतिष महाजन यांनी स्पष्ट केले.
. मूर्तिजापूर येथील श्रीराम प्रतिष्ठान मोरारजी चौक येथे रविवार दि. ६ एप्रिल श्रीराम नवमी दिनी सायंकाळी ६ वाजता मध्यप्रदेशच्या मंदसौर येथील सुप्रसिद्ध गायिका अधिष्टा व अनुष्का भटनागर यांच्या सुमधुर वाणीतून भजन संध्येचे आयोजन तसेच कार्यक्रम स्थळी प्रभू श्रीराम, हनुमान मूर्ती, खाटू शाम बाबा यांच्या सह विविध देवतांच्या देखाव्याचे व दर्शनाचे भाविकांना लाभ मिळणार असून सदर कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा. तसेच कार्यक्रमाच्या स्थळी होणारी गर्दी लक्षात घेता श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने खाजगी सुरक्षा रक्षकांसह स्थानिक पोलीस प्रशासनाची सुरक्षा असणार आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रम बघण्याकरता येणाऱ्या महिला भगिनी वर्गांनी कृपया येतांना कुठल्याही प्रकारचे मौल्यवान वस्तू अथवा दागिने घालणे टाळावे जेणे करून सदर कार्यक्रमास कुठलाही डाग लागता कामा नये असेही आवाहन आतिश महाजन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News मूर्तीझापूर -अकोला.