३० वर्षीय युवकाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या…! मूर्तिजापूरात हृदयद्रावक घटना
मूर्तिजापूर, ३ एप्रिल २०२५ (CEN News):
मूर्तिजापूर येथील दर्यापूर मार्गावरील उड्डाण पुलाजवळ गुरुवारी दुपारी घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जामठी (बु) येथील अक्षय सुनिलराव देशमुख (वय ३०) या युवकाने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.
घटना दुपारी २.३० ते ३ वाजेच्या सुमारास मुंबई-नागपूर लोहमार्गावरील रेल्वे पोल क्रमांक ६२१/९ ते ६२२ दरम्यान घडली. अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस (गाडी क्रमांक १२८३३) च्या समोर उडी घेऊन अक्षयने आपली जीवनयात्रा संपवली.
अक्षय हा नागपूर येथे रेल्वे एसी कोच अटेंडंट म्हणून कंत्राटी पद्धतीने कार्यरत होता. त्याचे वडील सुनील मुगुटराव देशमुख यांनी माहिती दिली की, त्यांनी अक्षयला स्वतः स्टेशनवर सोडले होते. परत जात असतानाच ही धक्कादायक घटना घडल्याची बातमी मिळाली.
अक्षयचे काही वर्षांपूर्वीच लग्न झाले होते व त्याला एक महिन्याचा चिमुकला मुलगा आहे. कुटुंबावर तणावाचे सावट असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर न्यायालयीन वाद सुरू असून, शासनाकडून दाताळा येथील शेती व घरावर बुलडोझर चालवण्यात आला होता. या मानसिक तणावामुळे अक्षयने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
कॅमेरामन: अमेय आगळेकर
विदर्भ ब्युरो चीफ: प्रतिक कुऱ्हेकर
CEN News, मूर्तिजापूर – अकोला