नवी मुंबईत तलावात बुडून दोन चिमुरड्यांचा मृत्यू; दोघांचेही मृतदेह सापडले
नवी मुंबई : वाशीतील कोपरी गाव परिसरातील तलावात बुडालेल्या दोन चिमुरड्यांचे मृतदेह सापडले आहेत. गणेश गुप्ता (वय १० वर्षे) आणि गोलू मन्सुरी (वय ८ वर्षे) अशी मृत मुलांची नावे आहेत. दोन्ही मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
