छत्रपती संभाजीनगर
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर शेकटा मंडळात पिक परिस्थितीची पाहणी केली.
गाढे जळगाव येथील गट नंबर ३७६ येथील मंजूर उस्मान खान पठाण यांच्या शेतात मंत्री बावनकुळे यांनी पाहणी केली. तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणेस दिले. अचूक पंचनामे करून शेतकऱ्यांना अधिकाधिक मोबदला कसा देता येईल, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना मोबदला मिळावा यासाठी ही शासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले.


