लाखपुरी येथील लक्षेश्वर संस्थान ला जाणाऱ्या रस्त्याचे तीन-तेरा…!
* दर्शनाला येणाऱ्या भाविकांना चिखलातून काढावा लागतो मार्ग.
* लोकप्रतिनिधी व शासनाचे दुर्लक्ष, भाविकांमध्ये होतो संताप व्यक्त.
अकोला :- जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेले लाखपुरी येथील श्री लक्षेश्वर संस्थान येथे श्रावण सोमवार निमित्य येणाऱ्या भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. मात्र लाखपुरी गावाच्या मुख्य प्रवेश द्वारा पासून ते श्री लक्षेश्वर संस्थान पर्यंत चा रस्त्याचे तीन-तेरा झाले असल्याने येथे येणाऱ्या भाविकांना मोठ्या कसरतीचा सामना करत चिखलातून मार्ग काढत जावं लागत आहे.
अकोला व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरती पायोशनी नदी तिरावरती अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात लाखपुरी हे गाव वसलेले आहे. या लाखपुरी गावात साडे अकरा ज्योतिर्लिंग असलेले श्री लक्षेश्वराचे(महादेव) स्वयंभू मंदिर असून यास अर्ध काशी चा ही दर्जा दिल्या जातो या ठिकाणी श्रावण सोमवार निमित्त अकोला, अमरावती, दर्यापूर, अंजनगाव, मूर्तिजापूर आदी ठिकाणवरून दर्शना करीता येणाऱ्या भाविकांची गर्दी कायम असते तर शेवटच्या श्रावण सोमवारी मूर्तिजापूर, दर्यापूर, अंजनगाव आदी ठिकाण वरून हजारो भाविक येथील पायोशनीचे पाणी कावडीने नेण्याची परंपरा पिढ्यान पिढ्या चालत आली आहे. शेकडो भरण्यांचे कावड पाणी भरून हजारो भाविक येथून जातात मात्र लाखपुरी गावाच्या मुख्य प्रवेश द्वारा पासून ते पयोशनी तिरापर्यंत असलेल्या कावड यात्रेच्या मार्गाचे तीन-तेरा झाले असून रस्त्याची मोठी दैनिय अवस्था झाली आहे. येथे येणाऱ्या भाविकांना मोठया कसरतीचा सामना करत चिखलातून मार्ग काढत जावं लागत आहे. मात्र या गांभीर्याकडे लक्ष देण्यास लोकप्रतिनिधी अथवा शासनास केव्हा सवड मिळेल असा प्रश्न भविकांना पडला असून अवघ्या दोन- तीन हप्त्यांवर येऊन ठेपलेली कावड यात्रा महोत्सव तोंडावर असतांना देखील शासनाची अथवा लोकप्रतिनिधी ची कुठलीही हालचाल दिसून येत नसल्याने येथे येणाऱ्या भाविकांना मोठया कसरतीचा सामना करत चिखलातून मार्ग काढत मनस्ताप सहन करत दर्शनास जाण्याची वेळ आली आहे. तर या मार्गावर कावड यात्रेदरम्यान अथवा येथे श्रावण सोमवार निमित्त येणाऱ्या भाविकांच्या वाहणाचे रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे अपघात होण्याचे नाकारता येत नसून या गांभीर्याकडे कावड यात्रे पूर्वी शासनाने अथवा लोकप्रतिनिधींनी जातीने लक्ष घालून कावड यात्रेकरूंचा व भाविकांचा प्रश्न सोडवण्याची मागणी भाविकांमधून सर्वदुरून होत आहे.
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News, अकोला.