मोटरसायकल रॅलीने ‘घरोघरी तिरंगा मोहिमे’चा शुभारंभ
भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास प्रत्येकासाठी प्रेरणादायी- जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला :-भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. ऑगस्ट क्रांतीदिन ते स्वातंत्र्यदिन सप्ताह पर्वावर ‘घरोघरी तिरंगा अभियाना’त प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘घरोघरी तिरंगा मोहिमेचा शुभारंभ आज सकाळी मोटरसायकल रॅलीने झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी मोटरसायकल रॅलीला हिरवी झेंडी
दाखवून रॅलीचा शुभारंभ केला.
रॅलीत जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील,अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे, उपजिल्हाधिकारी शरद जावळे, उपजिल्हाधिकारी महेश परांडेकर, जि.प उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिहार यांच्यासह विवीध विभागाचे कार्यालय प्रमुख, विविध शाळांमधील शिक्षक व नागरिक सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयापासून पुढे तिरंगा रॅली अशोक वाटिका चौक, खंडेलवाल भवन, हुतात्मा चौक, सिव्हिल लाईन रोड, जिल्हा स्त्री रुग्णालय, अग्रसेन चौक,नविन बसस्थानक, अशोक वाटिका चौकामार्गे पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन समारोप करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी तिरंगा प्रतिज्ञा घेतली.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी प्रास्ताविक केले. नीलेश गाडगे यांनी केले. रॅलीची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News अकोला.