स्वछतादूत कर्मयोगी गाडगे महाराजांच्या कर्मभूमिच कचऱ्याच्या विळख्यात.
मूर्तिजापूर :- स्वच्छतेचा नारा देत शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन – प्रशासनाकडे अनेक उपाय योजना आखल्या जातात.यासाठी करोडो रुपयांचा निधीही खर्च केला जातो.
एकीकडे केंद्र शासन १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर दरम्यान ‘ स्वछता ही, सेवा ‘ अंतर्गत स्वच्छता पंधरावडा राबविते. परंतू, मुर्तिजापूर शहरातील स्वच्छतेची परिस्थिती पाहिली तर स्वच्छता नेमकी होते तरी कुठे,असा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही.मुर्तिजापूर शहराची ओळख ही स्वच्छतादूत कर्मयोगी गाडगे महाराजांच्या नावाने जगभरात प्रसिद्ध आहे.मात्र मुर्तिजापूर शहरात सद्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले चित्र आहे.अनेक नाल्या तुबल्या असून,शहरातील विविध चौकात व रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहे.नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे.मुर्तिजापूर नगर परिषद अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्चून घणंकचरा संकलन करण्याकरिता “घंटागाड्यांचे” नियोजन करण्यात आले. असून,याकरिता शहरातील स्टेशन विभाग एका कंत्राटदारास कचरा संकलनाचा कंत्राट ही देण्यात आलेला आहे.कचरा संकलनाकरिता अंदाजे प्रती दिवस ४० हजार रुपये शासनाच्या वतीने खर्च केल्या जातो.मात्र शहरात विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येतात. मग स्वछता कसली..? याचेच जिवंत उदाहरण म्हणजे जुनी वस्ती स्थित असलेल्या सुभाषचंद्र बोस चौक (काळा गोटा) येथे दि.२२ रविवार रोजी येथील संतप्त नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. जुनी वस्तीतील सुभाषचंद्र बोस चौक (काळा गोटा) परिसरात श्री स्वामी समर्थ मंदिर, रेणुका माता मंदिर, जैन मंदिर आदी धार्मिक प्रार्थना मंदिर असून या रस्त्याने येणाऱ्या – जाणाऱ्यां भाविकांची गर्दी असते मात्र गेल्या ४ ते ५ दिवसांपासून या चौकात कचरा संकलना करीता गाडी आली नसल्याने येथील सुभाषचंद्र बोस यांच्या फोटो समोरच मोठ्या प्रमाणात काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्याने एका प्रकारे ही महापुरुषांची अव्हेहेलना करणे नव्हे का..? कसा संतप्त , सवाल नागरिकांनी केला आहे. एवढेच नव्हे तर काही नागरिक या रस्त्यावर कचऱ्यांसह मासाचे तुकडे टाकत असल्याने भाविकांकडून मोठा रोष नगर परिषद प्रशासनावर व्यक्त केल्या जात आहे.
———————————
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर – अकोला.