नवी मुंबई महानगरपालिका : पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रसारित करीत स्वच्छता सायक्लॉथॉनमध्ये 500 हून अधिक सायकलपटूंचा सहभाग नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनीही सायकल चालवित घेतला प्रत्यक्ष सहभाग
स्वच्छतेप्रमाणेच पर्यावरणहिताय उपक्रमांवरही ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भर देण्यात येत असून ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियानांतर्गत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आयोजित करण्यात आलेली ‘स्वच्छता सायक्लोथॉन’ 500 हून अधिक सायकलपटूंच्या सहभागाने यशस्वीरित्या संपन्न झाली. विशेष म्हणजे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्वत: सायकल चालवित या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होऊन स्वच्छता व पर्यावरणाचा संदेश प्रसारित केला.