नवी मुंबईमध्ये ४ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी :
महिला सुरक्षितेसाठी CCTV यंत्रणा सज्ज
राज्यांमध्ये नाहीतर देशामध्ये मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
नवी मुंबईमध्ये गतवर्षी दीड दिवसाच्या दहा हजार पेक्षा जास्त घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन झाले आहे.
200 पेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याची नोंद झाली आहे.
गणेश चतुर्थी आनंदाने पार पडावी आनंदाने पार पाडावी यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून 4000 पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
तसेच क्यूआरटी, स्ट्राइकिंग पोलीस, रिझर्व पोलीस, महत्त्वाच्या रोडवर पेट्रोलिंग मेन जंक्शनवर पोलीस गस्त घालत असणार आहेत.
नवी मुंबई मधील संपूर्ण एरिया नागरिकांसाठी 24 तास खुला राहावा त्यांना बाप्पाचे दर्शन तसेच देखावे बघायला मिळावे यासाठी नेहमी पोलिसांकडून योग्य ती सुरक्षा करण्यात आली आहे.
महिलांच्या सुरक्षेला घेऊन महिलांसाठी व पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा तयार करण्यात आले आहेत. तसेच निर्भया पथक व बीट मार्शल 24 तास अलर्ट राहणार आहे. नवी मुंबई गणपती मंडळाला मध्ये CCTV यंत्रणा बसवण्यात आली आहे.
कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडल्यास 112 यावर संपर्क साधल्यास पंधरा मिनिटात मदत मिळेल असं नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी एनडीटीवी शी बोलताना सांगितलं
Byte: नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री.मिलिंद भारंबे.