अमित शाह दोन दिवशीय मुंबई दौऱ्यावर : विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मानला जातो महत्त्वाचा दौरा
———-
सपत्निक घेतले लालबागच्या राजाचे दर्शन
———-
मुंबई :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांनी ” लालबागचा राजा ” चे दर्शन घेऊन नतमस्तक झाले.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट देवून गणरायाचे दर्शन घेऊन महाआरती केली.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाह यांचे श्रीकृष्णमूर्ती, शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
अमित शहा दरवर्षी ‘लालबागचा राजाच्या’ चरणी नतमस्तक होण्यासाठी मुंबईमध्ये सहकुटुंब येतात, त्याच प्रकारे यंदाही त्यांचा दौरा असला, तरीसुद्धा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा फार महत्त्वाचा मानला जात आहे.
यावेळी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या मातोश्री सरिता फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, कन्या दिविजा फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मंत्री विनोद तावडे, आमदार आशिष शेलार हे उपस्थित होते.
———————————
ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मुंबई.