श्रीराम नवमी शोभयात्रेत मानवतेचा संदेश..!
—————————————-
मूर्तिजापूर :- प्रभू श्रीराम नवमी जन्मोत्सव समितीच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या भव्य शोभयात्रा मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांकरिता पेय जल, मठ्ठा व नास्ता देऊन माणुसकीचा संदेश देण्यात आला आहे.
. श्रीराम नवमी निमित्त भगवान पुरुषोत्तम राम यांच्या जन्मोत्सवानिमित्त शहरातील जुनी वस्ती परिसरात असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिर येथून सायंकाळी भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेच्या मार्गांवर वाटेत महाराजा चौक येथे विदर्भ मंगलमुखी किन्नर फाउंडेशन मुर्तीजापुर च्या अध्यक्ष नेहा दिलजान गुरु माँ किन्नर यांच्या वतीने वाढत्या उन्हाच्या चटक्यांपासून वाचण्याकरिता नागरिकांकरिता मठ्ठा वाटप करून एक मानवतेचा संदेश देण्यात आला आहे.
तर वाल्मीक सेना व महाकाल सेना यांच्या संयुक्त विद्यमाने पेय जल ची व्यवस्था करून शोभायात्रेच्या मार्गाचे स्वयंस्फूर्तीने स्वछता करीत नगर परिषद कार्यालया समोर शोभायात्रा समितीचे अध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, शोभायात्रेत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवत लावण्यात आल्याने शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव, आमदार हरिष पिंपळे, कमलाकर गावंडे, रितेश सबाजकर यांच्यासह आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी वाल्मीक सेना अध्यक्ष बंटी धामणे, व महाकाल सेनेचे अध्यक्ष लखन मिलांदे यांच्यासह वाल्मीक समाज मुर्तीजापुर सकल पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोभायात्रेच्या मार्गावर स्टेशन विभाग परिसरातील सराफ लाईन परिसरात रात्री उशिरापर्यंत चालत असलेल्या शोभायात्रेतील नागरिकांकरिता गोपाल दायमा व मित्र परिवारांच्या वतीने नाश्त्याचे वितरण करण्यात आले. यावेळी शोभायात्रेच्या समारोपण वेळी स्टेशन विभाग श्रीराम मंदिर येथे आमदार हरिष पिंपळे यांच्या वतीने महाआरती व मठ्ठा तसेच प्रसादाचे वितरण करण्यात आले. या सामाजिक कार्यातून मानवतेचा व ऐकतेचा संदेश देण्यात आला आहे.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.