शेगाव पोलीस ठाण्यात ठाणेदार नितीन पाटील यांचा राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेकडून सत्कार
शेगाव .रेल्वे स्थानक व परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच महिला सुरक्षेसाठी प्रभावी कार्य करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विश्व पानसरे व माजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रेणिक लोढा यांचे आभार मानण्यासाठी व शेगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष, लोकप्रिय व दबंग ठाणेदार श्री. नितीन पाटील यांचा सत्कार करण्यासाठी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. माधुरी शर्मा, विदर्भ प्रदेशाध्यक्षा सौ. मनीषा टाकसाळ, बुलढाणा जिल्हा अध्यक्षा सौ. वैशाली जोशी, दिव्यांग आघाडी जिल्हा अध्यक्षा सौ. जयश्री गीते, अमरावती जिल्हा सचिव ॠतुशाली धावडे, जिल्हा उपाध्यक्षा सौ. हर्षा डवले व सौ. अनिता शर्मा, शेगाव तालुकाध्यक्ष सौ. प्रीती तिवारी यांच्यासह कार्यकर्त्या कुमुदिने मंडले, प्रणिता
शिरभाते, जयश्री मिलिंद पवार, चंदा सुरेश ददगाळ यांनी उपस्थित राहून ठाणेदार नितीन पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
=======================
जिल्हा प्रतिनिधी इस्माईल शेख
शेगाव बुलढाणा
Cen news