राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(श. प) गटाच्या वतीने शिव स्वराज्य शेतकरी यात्रा…!
______________________
- मूर्तिजापूर विधानसभातील शेतकऱ्यांशी साधणार संवाद..
- ३०० हून अधिक गावात जाणार शिव स्वराज्य शेतकरी संवाद यात्रा..
________________________________________________
मूर्तिजापूर :- येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाच्या वतीने शिव स्वराज शेतकरी संवाद यात्रेचे माँ जिजाऊ व शिव छत्रपती यांच्या पुतळ्याचे पूजन करून शिव स्वराज शेतकरी संवाद यात्रा रथाचे नारळ फोडून यात्रेला सुरवात करण्यात आली.
मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघातील मूर्तिजापूर व बार्शीटाकळी तालुक्यातील ३०० हून अधिक गावा-गावात जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाच्या वतीने शिव स्वराज शेतकरी संवाद यात्रे चे आयोजन करण्यात आले असून सदर यात्रा ही मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघात पुढील ४० दिवस चालणार असल्याचे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श. प) गटाचे प्रदेश सरचिटणीस तेजस जामठे यांवेळी बोलत होते.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळावी, पिकवलेल्या शेतमालाला उत्पादक खर्चावर आधारित रास्तभाव मिळावा, आचारसंहिता पूर्वी पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, शेतकऱ्यांना संपूर्ण विजबिल मुक्त करावे, सरसकट धान्य पुरवठा सुरु करावा, शेतकऱ्यांना लागत असलेली जी. एस. टी तात्काळ बंद करावी, घरकुल आवास योजनेचे रखडलेले पैसे तात्काळ जमा करावे, शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्यासाठी पानधन रस्त्याची व्यवस्था करावी, मूर्तिजापूर मतदार संघातील रस्त्याची झालेली दैनिय अवस्था चे कामे मार्गी लावावे आदी मागण्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श. प) गटाचे प्रदेश सरचिटणीस तेजस जामठे यांच्या पुढाकारणे मूर्तिजापूर मतदार संघातील बार्शीटाकळी व मूर्तिजापूर तालुक्यातील ३०० अधिक गावात सदर यात्रा पोहचणार असून या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेणार आहे.
या शिव स्वराज शेतकरी संवाद यात्रेची सुरवात महाराष्ट्रा चे आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून रथा समोर नारळ फोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते ऍड भैय्यासाहेब तिडके यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रदेश सरचिटणीस तेजस जामठे,सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, जिल्हा, तालुका,शहर, महिला व युवक-युवती तथा सर्व सेल चे पधादिकारी यांच्या सह महाविकास आघाडीतील शिव सेना(उ. बा. ठा) गट, कॉग्रेस, शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, विदर्भ आंदोलन समिती यांच्या पदाधिकाऱ्यांसह पाठींबा देत नागरिकांची व शेतकरी बांधवांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
कैमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News अकोला.