मूर्तिजापूर येथील जुनी पोलीस वसाहतीस भीषण आग…!
———————————-
मूर्तिजापूर :- येथील जुनी वस्ती स्थित असलेल्या कच्ची लाईन जुनी पोलीस वसाहतीत अचानक भीषण आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.
मूर्तिजापूर जुनी वस्ती स्थित असलेल्या कच्ची लाईन येथील जमादार यांच्या मालकीच्या व सध्या स्थित शासनाच्या अतिरिक्त्या खाली असलेल्या जुनी पोलीस वसाहत मध्ये शुक्रवार दि. २३ रोजी सकाळी १० ते ११ वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडली. गेल्या कित्येक दिवसांपासून पडीत असलेल्या या वसाहतीत कोणीही वास्तव्यास नसल्याने सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी नेमकी पावसाळ्याच्या ऋतूत आग लागणे म्हणजे एक प्रकारची शंका व्यक्त केल्या जात आहे.
जुन्या काळातील लाकडाच्या नाटेत, टीनाचे छत असलेल्या या वसहतीचे बांधकाम असल्याने व यातील लाकडाने आग पकडल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन पथकला कसरतीचा सामना करावा लागला. तर आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने आगीच्या लोट च्या लोट बाहेर येत होता तर परिसरात मोठ्या प्रमाणात दुराचा लोट होता. विशेष म्हणजे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक तर दाखल झाले मात्र अग्निशमन दलाचे कर्मचारी इतरत्र फिरत असतांना दिसत होते तर पाणी मारण्याचे काम हे येथील उपस्थित नागरिक करत असल्याचे दिसून आल्याने लाखो रुपये वर्षा काठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांवर प्रशिक्षणा चे खर्च करून काय फायदा..? असा प्रश्न उपस्थितानी केला आहे. करोडो रुपये खर्चून नगर परिषद मार्फत घन कचरा संकलन चा कंत्राक्त देण्यात आला आहे. मात्र सदर घडलेल्या इमारतीत कित्येक दिवसांपासून कचरा साठून असलेल्याने आग लागली असल्याचे परिसरातील काही रहिवास्यांनी बोलतांना सांगितले. तर नेमकी आग लावली की, लागली असावी याचा शोध मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ अधिकारी भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहे.
____________
कैमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News अकोला.