सहकार नेते ऍड. सुहास तिडके यांचा वाढदिवस समाज कार्यातून संपन्न…!
* गुणवंत विद्यार्थ्यांना केले सायकल चे वाटप.
* महिला बचत गटाचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार.
मूर्तिजापूर :– येथील माजी आमदार तथा सहकार नेते ऍड. सुहास (भैय्यासाहेब) तिडके यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यातून मोठ्या उत्साहात येथील आशीर्वाद लॉन येथे हजारो चाहत्यांच्या साक्षीने संपन्न झाला.
या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) नेते तथा माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शहरातील आशीर्वाद लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक आघाडी प्रदेश सरचिटणीस तेजस जामठे यांच्या वतीने ऍड. सुहास( भैय्यासाहेब ) तिडके यांचा वाढदिवसाच्या निमित्याने गुणवंत विद्यार्थ्यांना सायकल देऊन गौरवण्यात आले . तर तालुक्यात महिला बचत गटाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बचत गटांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शविली.
केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता असतानाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नसून, सध्या सरकार च्या वतीने सुरु करण्यात आलेल्या “बहीण माझ्या लाडाची” व “भाऊ माझ्या लाडाचा” ही योजना फक्त निवडणुका पूर्तीचं मर्यादित असून या माध्यमातून महिलांची व युवकांची एका प्रकारे सरकार फसवणूक करत थट्टा करत आहेत, येणाऱ्या निवडणुकीत नवयुवक उमेदवाराची गरज असून तेजस जामठे सारख्या समाजसेवकांची खरी गरज असल्याचे यावेळी माजी गृह मंत्री अनिल देशमुख बोलत होते. मात्र यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलण्यास माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टाळाटाळ केली.
या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव गावंडे, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, प्रा. विश्वनाथ कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष श्यामबाबू अवस्थी, प्रदेश संघटन सचिव रवी राठी, सुनील धाबेकर, महानगर अध्यक्ष रफिक सिद्दिकी, युवा प्रदेश कार्याध्यक्ष अनंता काळे, महासचिव आनंद वानखडे, अमरावती युवक जिल्हाध्यक्ष रोशन कडू, पांडुरंग ठाकरे, निजाम भाई इंजिनियर, इब्राहिम घानीवाले, माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश कुकडे, शहराध्यक्ष राम कोरडे, विधानसभा प्रमुख सागर कोरडे, संदीप जळमकर, महिला तालुकाध्यक्ष रंजना सदार, दिपालीताई देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिवाकर गावंडे यांनी तर आभार संदीप जळमकर यांनी मानले.
___________
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News अकोला.