राज्यातील पद्म पुरस्कार व पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचा अभिनंदन सोहळा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे झाला. वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानने याचे आयोजन केले होते.
यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अविनाश नाईक, विश्वस्त मुश्ताक अंतुले, आनंद पटवर्धन व अंजली नाईक पिरामल उपस्थित होते.
सन्मानार्थींमध्ये अच्युत पालव,अभिनेते अशोक सराफ, पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती – अमरावतीची करिना थापा, पद्मश्री प्राप्त सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार, बासरी वादक रोणू मजुमदार, प्रसिद्ध डॉक्टर विलास डांगरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व पार्श्वगायक पंकज उधास (मरणोपरांत) यांचा समावेश आहे.