राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेव्हज २०२५ निमित्त आयोजित ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनिया (WXM)’ कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियाचे आयोजक व इतर मान्यवर उपस्थित होते.
भारताला प्रो रेसलिंगसाठी स्वतःचे व्यासपीठ ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनिया’मुळे उपलब्ध झाले आहे. भारतासाठी हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जगाला दिलेले ठोस उत्तर आहे की भारत सर्वकाही करू शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.