प्रचार तोफा थंडावण्या काही तास आधी भाजपा महिला आघाडी चे पदयात्रा शक्ती प्रदर्शन..!
—————————————-
निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या, पुढे एक दिवस छुपा प्रचार सुरू राहणार..
—————————————
अकोला :- जिल्ह्यातील मुर्तीजापुर मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावण्याच्या काही तास आधी भाजपा महिला आघाडी व कार्यकर्त्यांच्या वतीने महायुतीचे उमेदवार हरिष पिंपळे यांच्या करिता शहरातून विशाल शक्ती प्रदर्शन करीत पदयात्रा काढण्यात आली.
यावेळी महिलांनी एकच नारा देत “लाडक्या बहिणींचा, लाडका भाऊ हरिष भाऊ” अश्या विविध घोषणा देत मोठ्या प्रमाणात महिला भगिनींनी स्वयंस्पृतिने आपला सहभाग नोंदविला.
१८ नोव्हेंबर सोमवारी सायंकाळी ५ वाजता विधानसभा निवडणूक प्रचाराचा शेवट झाला असून राजकीय पक्षांच्या प्रचार तोफा सायंकाळी ५ च्या ठोक्यावर थंडावल्या आता उद्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तेची चावी कोणाच्या हाती याचा निर्णय २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. नियमानुसार आता प्रचार संपला असून यापुढे एक दिवस छुपा प्रचार सुरू राहणार आहे.
या पदयात्रेदरम्यान आमच्या प्रतिनिधींनी आमदार हरिष पिंपळे यांच्याशी साधलेला संवाद..
—————————————-
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला