मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात उलेमा आणि मुस्लिम समाज मौलाना सज्जाद नोमानी यांच्या निर्णयावर महाविकास आघाडीचे उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आला आहे.
दि 18/11/2024ला मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील बार्शीटाकळी तालुक्यातील काही मुस्लिम युवकांनी जमियत उल उलेमा संघटनेच्या नावावर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना समर्थन दिले होते. मात्र त्या चार लोकांचा वैयक्तिक पाठींबा असून त्यांचा सदर संघटनेचा कसलाही संबंध नसल्याचे यावेळी सांगण्यात आलेय.
त्या व्यतिरिक्त मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सम्राट जयरामजी डोंगरदिवे यांना समर्थन असल्याचे आज जाहीर केले.
यावेळी जफर हुसेन खातीब साहेब, मुक्ती सबदर मुक्ती मुंगताजीम, मौली सफदर, मौली इलियास, हापीस अबूबकर, मौली शारिक, हापीस कौसर, हापिज शब्बीर, हापिज तौफिक व हापिज आताऊल्ला आदी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————
*विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.