राष्ट्रवादी सुरक्षा कवच “भाऊ येतोय भेटीला” कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती..!
* रक्षाबंधन निमित्य राष्ट्रवादी सुरक्षा कवची महिलांना भेट..
अकोला : – राज्यात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार असून सर्वक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांचे दौरेही वाढले आहेत. दरम्यान, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मूर्तिजापूर दौरा येत्या १९ आगस्ट रोजी पक्का झाला असून या करीता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरदचंद्र पवार) गटाचे प्रदेश संघटन सचिव सम्राट डोंगरदिवे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कार्यकर्त्यांकडून मोठी जय्यत तैयारी सुरु आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय नेत्यांचे दौरे मोठ्या प्रमाणात सुरु असून प्रत्येक राजकीय पक्ष हा वेगवेळ्या शक्कल लढून आपल्या नेत्यांचे सभा घेत आहे. येत्या १९ आगस्ट रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरदचंद्र पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे रक्षाबंधन निमित्य राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) गटाचे प्रदेश संघटन सचिव सम्राट डोंगरदिवे यांच्या वतीने महिलांकरिता आयोजित राष्ट्रवादी सुरक्षा कावच “भाऊ येतोय भेटीला” कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सह माजी गृहमंत्री अनिल देशमुख, महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिणीताई खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,जि. प सदस्या सौ सुमनताई गावंडे यांच्या सह अनेक नेत्यांची उपस्थिती असणार असून त्यांच्या या दौऱ्याची मूर्तिजापूर येथील जिल्हा परिषद हयास्कुल क्रिडांगण(लाल शाळा) छत्रपती शिवाजी नगर येथे जैय्यत तैय्यारी सुरु आहे. जयंत पाटील यांच्या सभे करीता उभारण्यात येत असलेल्या भव्य दिव्य मंडपाचे यावेळी रीतसर पूजन करून नारळ फोडण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस च्या प्रवक्त्या तेजस्विताई बारबद्दे, प्रदेश संघटन सचिव सम्राट डोंगरदिवे, शहराध्यक्ष रामभाऊ कोरडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील पवार,प्रशांत वानखडे, निखिल ठाकरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News अकोला.