नातवंडांच्या शाळेत आजी आजोबांची धमाल…!
———————————-
* आजी आजोबा रमले नातवंडांच्या शाळेत..
* जिल्ह्यातील पहिला इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन चा अनोखा उपक्रम..
———————————-
मूर्तिजापूर :- “नोकरी-व्यवसायामुळे पालकांना मुलांसोबत वेळ घालवता येत नाही. त्या पाल्यांना आजी-आजोबांचा आसरा असतो. त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीचा इतर विद्यार्थ्यांनाही लाभ मिळणार आहे.
आजी-आजोबा हे पहिले मित्र असतात. या नात्याची तेथूनच खरी जडणघडण असते. हे नाते पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे आणि प्रेरणादायी आहे. आजच्या काळात हे नाते टिकून राहावे, यासाठी हा उपक्रम सुरू करण्याचा उद्देश आहे, असे प्रतिपादन इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशनच्या मुख्याध्यापिका सौ प्रणाली प्रविण भटकर ह्या आजी आजोबांसाठी आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलत होत्या.
मूर्तिजापूर येथील तिडके नगर स्थित इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन येथे आजी – आजोबांसाठी खास नातवंडाच्या शाळेत स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यांच्यासाठी त्यांच्याच नातवंडांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. निमित्य होते, आजी -आजोबांचा दिवस जग भरात मदर्स डे, फादर्स डे साजरा केल्या जातो. माझी आजोबांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्याची संधी तशी मिळत नाही. या अनुषंगाने इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन ने अनोखी शक्कल लढावीत आजी-आजोबांसाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करीत “एक दिवस नातवंडाच्या शाळेत” हा उपक्रम राबविला.
या वेळी नातवंडांनी आपल्या आजी व आजोबांकरीता सांस्कृतिक कार्यक्रम राबविले यात गणेश वंदना,कोळी नृत्य, मंगळागौर आदींचे सादरीकरण केले तर यावेळी शाळेच्या प्रांगणात तान्हा पोळा ही भरविण्यात आल्याने आजी-आजोबांसाठी हा दिवस यादगार बनल्याचे या वेळी काही आजी आजोबांनी आपल्या भावना व्यक्त करताना बोलताना सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रणाली प्रविण भटकर(माँ) यांच्या मार्गदर्शनात,तृप्ती बुटे, वैशाली अढाऊ, प्रतिक्षा कुऱ्हेकर, काजल ठाकरे, प्रियांका अंभोरे, रुपाली हुरबडे, रेखा देशमुख , वैष्णवी बावणे, अनुराधा वानखडे, दिशा कावरे, रमा हरणे , रेश्मा खरड, सुरेखा पराते, दिपीका बोळे , सुजता मोरे ,मिनाक्षी सातपुते, मयुरी जावरकर, व्हीलसन सिरसाठ, श्रीकृष्ण तायडे, विशाल गावंडे तसेच सर्व शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथर्व प्रयत्न केले तर कार्यक्रमास पालक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
———————————-
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News अकोला.