हजारो शेतकरी विविध मागण्याधरून बसले साखळी उपोषणास..!
———————————-
अकोला :- सोयाबीन ला हमी भाव मिळावा या सह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मूर्तिजापुरातील तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या आयात-निर्यात धोरणामुळे
सोयाबीनचे घसरलेले भाव, उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव व बाहेरील बाजारात क्विंटल मागे असलेला एक हजार रुपयाचा फरक शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारा आहे. यामुळे एकरी पाच ते दहा हजाराचे नुकसान होणार असून सोयाबीनची खरेदी नाफेडद्वारे व्हावी त्याकरिता सप्टेंबर पूर्वी खरेदी केंद्र सुरू करावीत, ई पिक पाहणी अट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदतीसाठी पात्र ठरवावेत, शेती व शेती अवजारे, बियाणे, खते जी.एस.टी. मुक्त करावेत. हमीभावाचा कायदा करून शेतीला संरक्षण द्यावे, पीक कर्ज वाटपाला कॅश क्रेडिटचे नियम लावावेत, कोट्यधीश आमदार-खासदारांचे पेंशन रद्द करून वयोवृद्ध शेतकरी-शेतमजुरांना मासिक दहा हजार रुपये पेंशन द्यावी. शेत कुंपणाकरता पंधरा वर्षाच्या दिर्घ मुदतीच्या कर्जाचे धोरण आखावे. मागील वर्षीचा खरीप-रब्बी पीक विमा त्वरित द्यावा. संपूर्ण कर्ज माफी करावी, शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये म्हणून शेतकरी लवादाची स्थापना करून त्या लवादाला दंडात्मक अधिकार द्यावेत. याकरिता प्रगती शेतकरी मंडळ मूर्तिजापूर, जनमंच, आंतरभारती ट्रस्ट, शेतकरी संघटना युवा आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, न्यू यंग क्लब फार्मर्स गृप, यंग बॉइज क्लबद्वारा ४ सप्टेंबरपासून तहसील समोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपोषणास सहभागी होण्याची आवाहन राजूवानखडे यांनी केले आहे.
____________
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News अकोला.