मूर्तिजापूरात मोफत भव्य नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया तपासणी शिबीर संपन्न…!
महाराष्ट्रीयन हिंदी भाषी समाज व दम्मानी नेत्र हॉस्पिटल चा उपक्रम
—————————————-
अकोला :- “नेत्रदान मनुष्याच्या मृत्यूनंतर केले जाते, तर इतर अवयवांचे दान मनुष्याच्या मृत्यूपूर्वी केले जाते. नेत्रदानाबद्दल समाजामध्ये चर्चा होते; पण ती जितकी विस्तृत हवी तशी होत नाही.त्याच प्रमाणे आपल्या परिस्थिती मुळे काही गरजूंना नेत्र तपासणी अथवा नेत्र शस्त्रक्रिया करणे अवघड जाते अशा गरजूंना समाज बांधवांच्या माध्यमातून एक सेवा घडावी व अश्या व्यक्तींना सुंदर जग पाहता यावे या उद्देशाने दरवर्षी आम्ही संस्थेच्या माध्यमातून शिबिर राबवित असून आत्तापर्यंत ३ हजार हुन अधिक गरजूंनी नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ घेतला.” असल्याचे नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या कार्यक्रमात महाराष्ट्रीयन हिंदी भाषी समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे बोलत होते.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील महाराष्ट्रीयन हिंदी भाषी समाज बहुदेशीय संस्था व इनर व्हील क्लब अकोला तसेच दम्मानी नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विध्यमाने शहरातील समता नगर येथील भक्ती धाम मंदिराच्या सभागृहात गरजू व्यक्तींन करिता मोफत भव्य नेत्र तपासणी व शस्त्रकीया आणि चष्मा वाटप शिबीराचे आयोजिन करण्यात आले होते. याचा १०० हुन अधिक रुग्णांनी लाभ घेतला.
दरवर्षी प्रमाणे यंदा देखील महाराष्ट्रीयन हिंदी भाषी समाज बहुद्देशीय संस्था व दम्मानी नेत्र रुग्णालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चष्मा वाटप शिबीर संपन्न झाले. या शिबिराचा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. यावेळी महाराष्ट्रीयन हिंदी भाषी समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, संजय जयस्वाल, शालिकराम यादव, कैलास महाजन, संभाजी ब्रिगेडचे संजय गुप्ता, माजी नगरसेवक भरत जेठावानी, विशाल गुप्ता, संतोष दुबे, अशोक दुबे, अभय पांडे, अनंत पांडे, डॉ. अर्पण दुबे, प्रविण पालिवाल, हरिप्रसाद दुबे, डॉ पवन पातालबंसी, नितीन उपाध्याय, सौ अनिता देविकर, संजय जयस्वाल, जवाहरलाल पातालबंसी, सनत दुबे, रमेश गुप्ता, शिवदास तिरकर, शिवप्रसाद महाजन, मुन्ना गुप्ता, गजानन दुरतकर, दीपक हांडे पत्रकार रोहित सोळंके, प्रकाश श्रीवास, अजय प्रभे त्याच प्रमाणे दम्मानी नेत्र हॉस्पिटलचे संचालक,डॉक्टर्स आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.