मुंबई
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेचा (IIPS) ६५वा आणि ६६ वा पदवी प्रदान समारंभ पार पडला. यावेळी डॉ. सुदेश धनखड, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, मंत्री जयकुमार रावल, आमदार सना मलिक, प्रो.डी.ए.नागदेवे आदी उपस्थित होते.
ही केवळ पदवी मिळवण्याची वेळ नाही, तर नवभारत घडवण्याच्या जबाबदारीची सुरुवात आहे. भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. आपली लोकशाही, लोकसंख्याशास्त्र आणि विविधता हे घटक भारताच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे दिशादर्शक आहेत. आधुनिक भारतात लोकसंख्याशास्त्र हे केवळ आकडेवारी नाही, तर ते आपल्या राष्ट्राची ओळख आहे. बेरोजगारी, आरोग्य सेवांतील असमानता, आणि प्रादेशिक असंतुलन या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी योग्य डेटाचा उपयोग अत्यावश्यक आहे. जनसंख्याशास्त्राचे विद्यार्थी, हे बदल घडवू शकतात – उपराष्ट्रपती