भावी आमदार बनण्याच्या नादात महाराष्ट्र संस्कृती कलंकीत
————-
दहीहंडी कार्यक्रमात ‘नटी’ नाचवली
————–
महाराष्ट्राच्या सांस्कृतिला काळीमा
————-
निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन गर्दी जमविण्याचा फंडा
————
दहीहंडी केवळ नातवासाठीच
अकोला
मूर्तिजापूर – भारतीय संस्कृतीप्रमाणे भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव दहिहंडी उत्सव संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मात्र अकोल्यातील मूर्तिजापूरात आयोजीत दहीहंडी उत्सव कार्यक्रमात एका चित्रपट नटीला आमंत्रीत करून भावी आमदार होण्याच्या नादात भारतीय संस्कृतीचा विसर रवि राठी जनसेवा फाऊंडेशन पडल्याचे समोर आले.
परंपरे नुसार दहीहंडी हा उत्सव बाल गोपाळांचा मानल्या जातो, ही परंपरा विष्णू चा अवतार असलेल्या श्रीकृष्णा पासून हजारो वर्षांपासून अविरत सुरु आहे. भगवान श्रीकृष्ण हे आपल्या सावंगड्यान सोबत दही, लोणी चोरून खायचे म्हणून गोकुळात घरोघरी दही, लोणी हे मटक्यात उंच बांधून ठेवायचे. हे दही व लोणी आपल्या सवंगड्यांच्या साहाय्याने भगवान श्री कृष्ण चोरून खायचे ती ही “दहीहंडी”…..
मात्र मूर्तिजापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश संघटन सचिव रवी राठी यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सावत एका “नर्तकी” स आणून नाचवणे म्हणजेच एक प्रकारे भारतीय हिंदू धर्माची चेष्टा करणे नव्हे का..? अशा कार्यक्रमात ‘नटी नाचवून महाराष्ट्र संस्कृती काळीमा फासण्याचा प्रकार मूर्तिजापूरत घडला. यावेळी नियोजित वेळेवर दहीहांडी कार्यक्रम नघेता मंचावरील बहूतेक नेते पदाधिकारी नटी सोबत फोटो काढण्यात मश्गुल होते, दुपारपासून दहीहंडी फोडण्यासाठी विविध ठिकाणावरुन आलेले गोविंदा पथकांना मात्र अनेक तास दहीहंडी कारणासाठी तातकळत बसावे लागले. यावेळी अनेक गोविंदा पथकांनी संताप व्यक्त केला.
पूर्वी निवडणुका लढविण्या करीता जेष्ठ विचारवंतांचे मत घेऊन त्यांचे विचार प्रदान केल्या जायचे. मात्र आताच्या काळात निवडणुका लढवण्याकरिता “नटी” ला नाचवून निवडणुका लढवल्या जात असल्याचे नुकतेच रवी राठी यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात चित्र पाहावयास मिळाले आहे. नव्या पिढी समोर आदर्श घडावा व एक चालना मिळावी या उद्देशाने सामाजिक उत्सवात विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रम राबविले जातात. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेश संघटन सचिव रवी राठी यांनी चक्क ही पद्धत मोडीत घालत “नटी” नाचवून महाराष्ट्रा च्या संस्कृतीला कलंकीत केल्याचे कार्यक्रमस्थळी अनेकांनी बोलून दाखवले
——————————–कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News अकोला.