नवी मुंबई महानगरपालिकेकडून लिडार सर्वेक्षणानुसार अनियमित कराबाबत आम्ही महानगरपालिकेचे सन्मान्य आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांना नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन दिले.
मुळा मध्ये या लिडार सर्वेक्षणा मध्ये अनेक त्रुटी आहेत, कोणत्याही तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून हे सर्वेक्षण करण्यात आले नाही आहे.प्रत्यक्ष मालमत्तेच्या जागेवर न पोहचता नजर अंदाजानुसार अकुशल कर्मचाऱ्यांकडुन सर्वे करण्यात आलेला आहे.
1) आमची मागणी आहे की लिडार सर्वेक्षणानुसार आकारण्यात आलेली कर प्रणाली तातडीने थांबवून पुन्हा पुर्वी प्रमाणे नियमितपणे कर आकारण्यात यावेत.
2) त्याचसोबत नवी मुंबई महानगरपालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या ॲडव्हान्स टॅक्स वर देखील इंटरेस्ट आकारण्यात येत आहे, कुठल्याही ॲडव्हान्स टॅक्स वर इंटरेस्ट आकारणे चुकीचे आहे, नवी मुंबई महानगरपालिकेने ॲडव्हान्स टॅक्स वर आकारण्यात येणारा इंटरेस्ट रद्द करावा अशी मागणी आम्ही केली आहे
३) वाशी मनपा रुग्णालय मध्ये तत्काळ MRI सुविधा उपलब्ध करुण द्यावेत!
४) मनपा शाळेच्या विद्यार्थांना लवकरात लवकर साहित्य आणि गणवेश देण्यात यावे