लोकसभेच्या निवडणुकीत बसलेल्या चपराकीमुळे तुम्ही महायुतीच्या सरकारचे लाडके बनले – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील..!
सम्राट डोंगरदिवे यांच्या माध्यमातून हजारो बहिनीना दिले पाच लाखाचे विमा कवच..
मूर्तिजापूर :- होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर व नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत चपराक बसल्यामुळे तुम्ही भाऊ-बहीण आत्ताच्या महायुती सरकारचे लाडके बनले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात भावी आमदाराच्या शर्यतीत असलेले मा. सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे यांच्या माध्यमातून मतदार संघातील तमाम बहिनीसाठी रक्षाबंधन निमित्त आयोजित राष्ट्रवादी सुरक्षा कवच ” भाऊ येतोय भेटीला ” या कार्यक्रमात मूर्तिजापूर येथील जिल्हा परिषद शाळा (लाल शाळा) च्या प्रांगणात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.पुढे बोलताना म्हणाले सध्याचे सरकार हे जनसामान्यांना लुटणारे तसेच भुलथापा देऊन दिशाभूल करणारे असल्याचे श्री पाटील यांनी म्हटले कार्यक्रमाला उपस्थीत जनसमुदाय विशेषतः महिला भगीनीची उपस्थिती पाहता सम्राट डोंगरदिवे यांच्या मागे भला मोठा विश्वास असल्याचे गौरवोद्गार काढत सम्राट डोंगरदिवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
महायुतीची लाडकी बहीण योजना हि तिन महिन्यापर्यंतच असून विविध योजना राबविल्या जात आहेत हा सर्व आटापिटया लाडक्या खुर्चीसाठी असल्याची टिका मा. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर हि योजना पाच वर्ष सुरू ठेवणार असून या सरकारने दिलेल्या तुटपुंज्या मदतीपेक्षा दुपटीने जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करणार असून ” भाऊ अनिल देशमुखांसारखा असावा” जो बहिणीला संकटात एकटाच सोडून जाणार नाही, असा टोला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाव न घेता अजित पवार यांना लगावला तर निवडणुकीच्या काळात तुमच्याकडे रंगीबिरंगी कपडे घालून काही लोक येतील त्यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला देत, महाविकास आघाडीचे सरकार आले तर लाडक्या बहिणी योजनेची रक्कम वाढवून देऊ असेही यावेळी जयंत पाटील महायुतीच्या नेत्यांना टोला लगावत बोलत होते.
याप्रसंगी सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सुमन ताई गावंडे दगड पारवा यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून माझी गृहमंत्री अनिल देशमुख, प्रदेशाध्यक्ष युवक मेहबूब शेख, माजी आमदार भैय्यासाहेब तिडके, जिल्हाध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे, राष्ट्रीय सरचिटणीस आशाताई मिरगे, प्रदेश प्रवक्त्या तेजस्विनी बारब्दे, रफिक सिद्दिकी, माजी आमदार प्रकाश गजभिये, शब्बीर भाई विद्रोही, श्याम अवस्थी, रमेश बंग, पांडुरंग ठाकरे, सुषमाताई कावरे, महिला तालुकाध्यक्ष रंजना सरदार, शहराध्यक्ष राम कोरडे यांसह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी प्रस्ताविक सम्राट डोंगरदिवे यांनी केले. मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघातील बहिणींना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरद पवार) गटाच्यावतीने ५ लाख रुपयांच्या विमा सुरक्षा कवचाची राखी भेट देण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, परीत्यक्त्या महिला व अपंग महिला यान करिता सदर विमा कवच राहणार असल्याची माहिती सम्राट डोंगरदिवे यांनी प्रास्ताविकातून दिली याप्रसंगी बोलताना सम्राट डोंगरदिवे भाऊक झाले होते. यावेळी अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. जनतेच्या आशीर्वादाने जर निवडून आलो तर पूर्ण पाच वर्ष सदर योजनेच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघातील भगिनींना पाच लाख रुपयांचा विमा कवच योजना सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN