विदर्भस्तरीयकुमारगट अजिंक्यपद खोखो सामान्यांचे उद्घाटन .
—————————————-
अकोल्यातील मूर्तिजापूर येथील श्री संत गाडगेबाबा क्रीडा मंडळ मूर्तिजापूर व अकोला जिल्हा खोखो असोसिएशनच्या विद्यमाने स्वर्गीय प्रा. ज्ञानेश्वर जी ढेरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ 43 वी विदर्भ अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे आयोजन दिनांक चार ते सहा नोव्हेंबर 24 पर्यंत येथील श्री गाडगे महाराज विद्यालय येथे घेण्यात येत आहेत. विदर्भातील 11 जिल्ह्यातील कुमार गटातील मुले व मुलींचे संघ यामध्ये सहभागी झाले या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज करण्यात आला व उद्घटनिया सामन्यांमध्ये पहिला सामना मुलां मध्ये वर्धा विरुद्ध यवतमाळ तर मुलिंमध्ये चंद्रपूर आणि वाशिम यामध्ये सामने झालेत .
आणि अतिशय शिस्तबद्ध व पारदर्शकतेने हे सामने आयोजकांनी घेऊन मुर्तिजापूर मध्ये खोखो प्रेमींना उत्कृष्ट दर्जाचा खेळ प्रेक्षकांना पाहवयास मिळत आहे.
खोखो स्पर्धेचे अंतिम सामने व स्पर्धेचा समारोप दि.6 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असल्याचे अकोला जिल्हा खो खो संघटनेच्या अध्यक्ष प्रा. मीना गावंडे तथा सचिव प्रा. अवधूत ढेरे यांनी सांगितले .
—————————————-
कॅमेरामन शाम वाळस्कर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मुर्तिजापूर अकोला