हातगावात शेतकऱ्याच्या घरावर चोरट्यांनी मारला डल्ला
पासष्ट ग्राम सोन्याच्या दागिन्यासह लाखो रुपयांची रक्कम लंपास ; घरमालकाचा हृदय विकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू…!
शहर पोलिसांना चोरांचे आव्हान ; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
—————————————-
मूर्तिजापूर :- शहरापासून अगदी जवळच असलेल्या हातगाव येथे सायंकाळी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान शेतकऱ्याच्या घरातील सोन्याच्या दागिन्यासह लाखो रुपयांच्या रोकडं वर चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना घडली. या घटनेने मात्र तालुका हादरला असला तरी पोलिसांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित होत आहे.
प्राप्त माहितीनुसार हातगावातील शेतकरी अशोक नामदेवराव बोळे यांच्या घरावर चोरटयांनी डल्ला मारत पासष्ट ग्राम सोनं व लाखो रुपयांची रोकड लंपास केली असल्याचे बोलल्या जात आहे या घटनेमुळे अशोक बोळे यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.मूर्तिजापूर शहरासह तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटना स्थळी मूर्तिजापूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे, शहर पोलीस स्टेशन चे निरीक्षक अजित जाधव यांच्या सह अकोला स्थानिक गुन्हे शाखे च्या पथका कडून कसून पाहणी सुरु असून मूर्तिजापूर शहर पोलीस घटनेचा तपास करत असले तरी चोरटे जणू पोलिसांना आव्हान देत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा करत असतांना देखील पोलीस प्रशासनास चोरट्यांचा शोध घेण्यास अपयश येत असल्याने अकोला पोलीसांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित होत आहे.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.