श्रीराम नवमी दिनी मूर्तिजापूरात भव्य मोटर सायकल रॅली व मिरवणूकीचे आयोजन..!
सार्वजनिक श्रीराम नवमी जन्मोत्सव समिती व सकल हिंदू समाज मूर्तिजापूर तर्फे आयोजन
मूर्तिजापूर :- हिंदू बांधवांचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जयंतीनिमित्त मूर्तिजापूर शहरात अनेक समाज संघटनांनी एकत्र जुनी वस्ती येथील स्वामी समर्थ मंदिर व श्रीराम मंदिरातून भव्य दुचाकी रॅलीचे व सायंकाळी भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले असून या या प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवात जास्तीत जास्त हिंदू ज्ञाती बांधवांनी आपला सहभाग दर्शवावा असे आव्हान श्रीराम जन्मोत्सव सोहळा समिती व सकल हिंदू समाज मुर्तीजापुरच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणींनी सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अनेक दुचाकींवर भगवे झेंडे बांधून तसेच भगव्या रंगाचे फेटे बांधून व गळ्यात प्रभू श्रीराम यांचे जय श्रीराम लिखित भगवे दुपट्टे परिधान करत शहरातील विविध भागातून ही रॅली फिरवण्यात येणार असून . ज्या ज्या ठिकाणावरून ही बाईक रॅली जात असेल त्या ठिकाणावरून संपूर्ण परिसरात भगवामय वातावरण सदृश्य परिस्थिती असेल. संपूर्ण शहरात दुचाकी रॅली भ्रमण करून स्टेशन विभाग परिसरातील श्रीराम मंदिरात रॅलीचा समारोप करण्यात येणार असल्याचे प्रभू श्रीराम जन्मोत्सव समिती व सकल हिंदू समाजाच्या वतीने हर्षल साबळे व विष्णू लोडम यांनी जुनी वस्ती स्थित बालाजी मंदिर येथे आयोजित श्रीराम नवमी जन्मोत्सव निमित्त बैठकीत बोलत होते.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News मूर्तिजापूर -अकोला.