महान धरणाला आकर्षक तिरंगा विद्युत रोषणाई…!
अकोला :- केंद्र शासनाच्या हरघरतिरंगा उपक्रमांतर्गत बार्शीटाकळी तालुक्यातील महान धरणाला तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी केंद्र शासनाने “हरघरतिरंगा” उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. याच अनुषंगाने अकोला जिल्हात बार्शीटाकळी तालुक्यातील महान धरणाला आकर्षक तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आलीये. भारताच्या स्वतंत्रदिनाच्या निमित्य अकोला व मुर्तीजापुर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणाला तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सध्या महान धरणात ८९ टक्के एवढा जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे ८५ टक्के जलसाठा आरक्षित ठेवण्यात आलाय. या अद्भुत सुंदर विद्युत रोषणाई करिता धरणाचे दहाही दरवाजे उघडण्यात आले असून यातून ४१ घ. मी प्रति सेकंद प्रमाणे १४४७ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र रात्री दहा वाजता सदर धरणाचे दरवाजे परत बंद करण्यात आले.
धरणाच्या दहाही सांडव्यावर विद्युत रोषणाईतून आकर्षक तिरंगा साकारला आहे. रात्रीच्या वेळी ही रोषणाई येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोळ्याचे पारणें फेडत होते. तर सदर दृश्य हे नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून स्थानिक नागरिक ही रोषणाई पाहण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
कॅमेरामन शाम वाळस्कर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News अकोला.