नव्याने अर्ज भरणाऱ्या महिलांना जुलै,ऑगस्ट आणि सप्टेंबरचा एकत्रित हप्ता थेट खात्यात जमा करण्यात येणार – देवेंद्र फडणवीस
अकोला :- लाडकी बहीण योजनेला राज्यात प्रचंड 1प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत दीड कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेची नोंदणी केली असून 17 जुलै रोजी जुलै आणि ऑगस्टचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. नव्याने अर्ज भरणाऱ्या महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचा एकत्रित हप्ता थेट खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ते अकोला येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित जिल्हा विस्तारित कार्यकारणी मेळाव्यात बोलत होते.
मुख्यमंत्री युवा कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील दहा लाख तरुणांना सहा महिने रोजगार देण्याचे काम राज्य शासनाच्या वतीने केल्या जात असून महायुती सरकारमध्ये सुरू असलेल्या लोकाभिमुख योजनांमुळे महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या चेहऱ्यावरील रंग हरवला असल्याचा टोला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
माहिती सरकारमध्ये मागील दीड वर्षात सौर ऊर्जेच्या माध्यमातून 12 हजार मेगावॉट विद्युत निर्मिती सुरू झाली असून सौर ऊर्जेमुळे सरकारवर कुठलाही आर्थिक बोजा घेणार येणार नसल्याने शेतकऱ्यांना मोफत वीज सुविधा उपलब्ध होणार आहे अशी माहिती यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहामध्ये जिल्हा विस्तारित कार्यकारणी बैठक पार पडली यावेळी माजी मंत्री संजय कुटे,खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिष पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, प्रदेश कार्यकारणी विशेष निमंत्रण विनायक वारे, आमदार आकाश फुंडकर, माजी गृहराज्य मंत्री डॉ रणजित पाटील,माजी महापौर विजय अग्रवाल यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कॅमेरामन शाम वाळसकर सह प्रतिक कुऱ्हेकर, CEN News अकोला.