आमदार गेले झोपी अकोट विधानसभा मतदारसंघाचा विकास खुंटीवर..!
अकोला :- भारतीय जनता पार्टी ही शिस्त व अनुशासन पाळणारी राष्ट्रीय राजकीय पार्टी म्हणून देशभरात ओळखल्या जाते मात्र जेव्हा विधानसभा निवडूकीच्या पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्रीच्या उपस्थीतीत आयेजीत जिल्हा विस्तारित कार्यकारणी बैठक मध्ये आमदाराला जेव्हा चक्क झोप लागते तेव्हा मात्र अशा बैठकीचा पार कचरा होऊन जिभेवर ” अहो, दाजीबा हे वागणं बर नव्ह” हे दादा कोंडके यांचे गाणे आपसूक येते. काल पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सभागृहात संपन्न झालेल्या जिल्हा विस्तारित कार्यकारणी बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधन केले. या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे अकोला जिल्ह्यातील आमदार पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मंचावर भाजपा राज्य कार्यकारिणीचे सरचिटणीस तथा अकोला पूर्वचे आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या बाजूला अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे हे सुद्धा होते या बैठकीदरम्यान मान्यवरांचे संबोधन सुरू असताना अकोट मतदार संघांचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना चक्क
झोप लागली. त्यांना लागलेली ही डुलकी एका कॅमेरात पत्रकारांनी कैद केली यावरून आता चर्चेला
उधाण आले आहे अकोट तेल्हारा मतदारसंघात आमदार प्रकाश
भारसाकळे यांच्या विरोधात सध्या स्थानिक भाजपा पदाधिकारी व
कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर
व्यक्त होत आहे. या विधानसभा
मतदारसंघांमध्ये स्थानिक आमदार हवा यावरून चांगलीच हवा टाईट झाली आहे. तर गेल्या पाच वर्षात अकोट अथवा तेल्हारा त कुठलेही विकास कामे झाले नसल्याचेही बोलल्या जात आहे. याचाच परिणाम
म्हणून कदाचित विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांची झोप लागली. की काय अशी चर्चा
होताना दिसत होती. तर अश्याच झोपा काढत असल्याने अकोट विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला नसावा न..? असा यक्ष प्रश्न सर्व सामान्यांना पडला असावा. यावरूनच
कदाचित त्यांना एवढ्या महत्त्वाच्या जिल्हा विस्तारित कार्यकारणीच्या बैठकीत झोप लागल्याची चर्चा
होत असून आगामी विधानसभा
निवडणुकीचे टेन्शन तर त्यांना
आले नसावे ना..? अशीही चर्चा
जोर धरत आहे. एकीकडे अकोला जिल्हा भाजपा मजबूत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी राज्याचे नेते कार्यरत असताना, अशा महत्त्वाच्या बैठकीत आमदाराने भर खुर्चीत झोप काढणे यावरून आता अनेक तर्क- वितर्क लावले जात आहेत. विशेष बाब
म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री यांच संबोधन सुरू असताना आमदाराने खुर्चीत डुलकी घेणे कितपत योग्य आहे. असेही बोलले जात आहे. या आमदाराच्या महत्त्वाच्या बैठकीत डूलकीची सर्वत्र चर्चा होत आहे.