मूर्तिजापूर तालुक्यात अनेक गावात डेंग्यूची लागण
————-
कुरुम संवेदनशील, आरोग्य यंत्रणा लागली कामाला
————-
खासगी रुग्णालयात घेत आहेत उपचार
————–
बालकांचा समावेश अधिक
———-
अकोला
मूर्तिजापूर तालुक्यात डेंग्यूने थैमान घातले असून या तालुक्यातील गावा गावातून डेंग्यूची लागण झालेले रुग्ण अनेक खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत, यात कुरुम गावातील रुग्णांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे, तर बालकांची संख्या अधिक आहे.
मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने खेडोपाडी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्याच्या दिवसात ग्रामपंचायतीने साफसफाईच्या कामात दिरंगाई केली असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. यातूनच डेंग्यूची लागण झाल्याचे बोलल्या जाते, कुरुम हे गाव तालुक्यात सगळ्यात जास्त लोकवस्तीचे गाव आहे, परंतु म्हणावी तशी स्वच्छता येथे दिसून येत नाही तर येथील आरोग्य केंद्राच्याच आजूबाजूला घाण साचली असल्याची माहिती आहे. तालुक्यातील कुरुम, मधापुरी, लंघापूर, सालतवाडा, सोनोरी, या शिवाय अनेक गावात डेंग्यूची लागण झेलेले रुग्ण मूर्तिजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. कुरुम येथे डेंग्यूची लागण झालेले डेंग्यू सदृश्य ताप असलेले जवळपास २० ते २२ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात कुरुम येथील सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा भाजपा सचिव, बाबुभाऊ देशमुख यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत कुरुम यांना माहिती देऊन सदर प्रकाराची गांभीर्यता लक्षात आणून दिली. तालुक्यात ५० च्या वर डेंग्यू रुग्ण असल्याचे समजते. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी बळीराम गाडवे यांच्याशी संपर्क साधला असता कुरुम येथे आरोग्य पथक दाखल करण्यात असून सर्वे करुन उपचार करण्याच्या सुचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
———————————-
कैमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News अकोला.