चिखली रेल्वे गेट राहणार तीन दिवस बंद
——-
मूर्तिजापूर :- दहिगाव गावंडे, अकोला जाण्याकरीता असलेला रस्त्याने पुढील तीन दिवस नागरीकांना वाहनाने जाता येणार नाही रेल्वे रुळाच्या दुरुस्तीमुळे ४ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट चिखली गेट वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
अकोला जाणाऱ्या प्रवाशांनी आपली वाहने चिखली गेट रस्त्याने न नेता इतरत्र रस्त्याने जावे रेल्वे गेट क्रमांक ५० चिखली गेट, मूर्तिजापूर – अकोला रस्त्यावरील रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम ४ ते ६ ऑगस्ट पर्यंत सुरू रहाणार आहे, त्या दरम्यान तीन दिवस बंद राहणार आहे, या मार्गाने रोज शेकडो वाहने ये – जा करतात विशेषतः अकोल्यात दवाखान्याच्या कामाने जाणारे बहुतेक वाहने या मार्गाने जातात सदर गेट हे तीन दिवस बंद रहाणार असल्याने नागरीकांना असुविधा होऊ नये म्हणून अकोल्याला इतर मार्गाने जावे असे रेल्वे विभागाने कळविले आहे.
____________
कॅमेरामन शाम वाळसकर विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News अकोला.