२०१६ च्या सर्जिकलं स्ट्राईक मधील आर्मी चा चंदू चव्हाण जवान मुंबईच्या रस्त्यावर आपल्या न्यायाची मागतोय भीक..!
—————————————-
मुंबई :- भारत मातेच्या राक्षणा करिता अहोरात्र आपल्या रक्ताचे पाणी करून वेळ आल्यास आपल्या जीवाची आहुती देणारे आर्मी चे तीन जवान मुंबई च्या रस्त्यांवर आपल्या न्यायाच्या हक्काची भीक मागत असल्याची शर्मनाक बाब समोर आलीये.
अंगात आर्मी ची वर्दी आणि एका हातात भारताचा राष्ट्रध्वज तर दुसऱ्या हातात भिकेचे कटोरे घेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर व मुंबई च्या रस्त्यांवर धुळे जिल्ह्यातील दोन व वाशिम जिल्ह्यातील एक आर्मी जवान आपल्यावर शासनाच्या वतीने झालेल्या अन्याया बाबत न्याय मिळावा या करिता चक्क भीक मागत असल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे यातील एक चंदू चव्हाण नामक जवान हा २०१६ मध्ये झालेल्या सर्जिकलं स्ट्राईक मधील असून याने आपल्या देशाच्या संरक्षणार्थ ४ महिने पाकिस्थानातील कारागृहात यातना सोसल्या असल्या ची आपबीती चंदू याने अपमाच्या प्रतिनिधिशी बोलतांना व्यक्त केल्यायेत.
भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा,केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोचे फलक व त्यावर ” हे कुठे भेटतील..?, यांना कोणीतरी शोधा. ” असे लिहलेले पोस्टर गळ्यात लावून मुंबई च्या रस्त्यांवर आपल्याला न्याय मिळावा या करिता भीक मागत फिरत आहे. आर्मी चे अमोल भालेराव वाशिम, चंदू चव्हाण धुळे तर सी. आर. पी. एफ चे जवान शिवप्रसाद पाटील धुळे असे यांचे नावे असून त्यांना सैंन्यातून किरकोळ कारणांवरून बडतर्फ केल्याने आज त्यांची स्तिती अक्षरशः आतंकवाद्यापेक्षाही खराब झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर आर्मी अथवा सीआरपीएफ लावलेल्या आरोपा मुळे त्यांना खाजगी क्षेत्रात अथवा शासकीय क्षेत्रात कुठेही नोकरी मिळत नसल्याने आमचे मुलं बाळ रस्त्यावर आले आहे त्यांचं भवि्तव्य धोक्यात असल्याचेही त्यांनी सांगितलंय.
या बाबत आमच्या प्रतिनिधिनी त्यांच्या सोबत केलेला संवाद..
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मुंबई.