नोव्हेंबर मध्ये लागणार बोटाला शाई..!
* ऑक्टोंबर मध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता…
____________
मुंबई : -राज्यातील विधानसभा
निवडणूक ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असे सर्वत्र मानले जात असताना ही निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे दिवाळीनंतरच होईल, अशी खात्रीलायक माहिती हाती आली आहे. नियमानुसार नवीन विधानसभा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी अस्तित्वात येणार आहे, त्यामुळे ऐन पावसाळ्यात आचारसंहिता, प्रचाराचा धुराळा कशासाठी, असा प्रश्न विचारला जात असून त्यामुळेच दिवाळीनंतर निवडणूक घेण्यावर निवडणूक आयोग विचार करू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
नवीन विधानसभेचे पहिले अधिवेशन ज्या दिवशी होते त्या दिवसापासून पाच वर्षे ती विधानसभा अस्तित्वात असते. २०१९ मधील निवडणुकीनंतर राज्यात नाट्यपूर्ण राजकीय घटना घडल्या होत्या.
____________
कॅमेरामन शाम वाळसकर सह ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News मुंबई.