आरपीएफ जवान विनोद बनला त्या प्रवाश्या करीता जीवनरक्षक..!
____________
•देव तारी, त्याला कोण मारी चा प्रत्येय घडला..
* काळ आला पण, वेळ नाही अशी घटना अकोला रेल्वे स्थानकावर प्रवाश्या सोबत..
__________
अकोला :- रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवाश्यांच्या हितार्थ वारंवार उदघोषणा करण्यात येते की, ” चालत्या गाडीतून उतरू नये,चढू नये अथवा गाडीच्या पायदानावर प्रवास करू नये” असे करणे धोकादायक आहे. मात्र अनेक प्रवाशी या सूचने कडे दुर्लक्ष करतात. हाच त्यांचा दुर्लक्षपणा एक दिवस त्यांच्या जीवावर बेततो अशीच घटना अकोला रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी घडलीये.
अकोला रेल्वेस्थानकावर सोमवारी सकाळी रेल्वे सुरक्षा बलाचे(आर. पी. एफ) जवान विनोद जटाले यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाचे प्राण वाचले आहेत. तर विनोद जणू या प्रवाश्या करीता देवदूत बनूनच आला असावा. ही घटना सोमवारी सकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर सकाळी ४.४५ वाजता घडली.
याबाबत माहिती अशी की, अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर गाडी क्रमांक १२१३५ पुणे ते नागपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वेगाडी सोमवार दि. १२ आगस्ट रोजी सकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास अकोला रेल्वे स्थानकावर दाखल झाली. गाडीतील प्रवाशी बाळकृष्ण इंगळे हा पुण्यावरून अकोला येथे आल्यानंतर चालत्या गाडीतून उतरत असतांना त्यावेळी त्या प्रवाशाचा पाय निसटला अन् तो चालत्या गाडीखाली कोसळणार एवढ्यात प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर ड्युटीवर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे (आर. पी. एफ) जवान विनोद जटाले यांनी मोठ्या चपळतेने झेप घेवून त्या प्रवाशास बाहेर खेचून काढले.
त्यामुळे प्रवाशी बाळकृष्ण इंगळे हे बालंबाल बचावले. आर. पी. एफ चे जवान विनोद जटाले यांनी दाखवलेल्या धाडसी करायचे मध्य रेल्वे च्या भुसावळ विभागातून कौतुकाचे वर्षाव सर्वदुरून होत आहे.
____________
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News अकोला.